प्रवचने व सत्संग (प्रश्न आणि उत्तर)

ञानेश्वरी , दासबोध प्रवचने व सत्संग ( पारमार्थिक प्रश्न व उत्तरे) हे कार्यक्रम अध्यात्म मंगल धाम व माया अपार्टमेंटस येथे नियमितपणे होतात. येथे होणाऱ्या विशेष केंद्रामध्ये साधक आपले चिंतन व पारमार्थिक अनुभव कथन करतात . प्रसंगी स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ यांच्या प्रवचनाच्या ध्वनी चित्र फीती (Video CDs) दाखविल्या जातात . हे सर्व कार्यक्रम मराठीमध्ये होतात


ध्यान केंद्र

दर रविवार सकाळी एक तासाची ध्यानाची बैठक स्वामी मकरंद नाथांसोबत होते. ध्यानानंतर स्वामी मकरंदनाथांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होते. तसेच काही रविवारी दोन तासांच्या दीर्घ ध्यानाच्या बैठकी देखील आयोजित केल्या जातात. नाम स्मरणाच्या बैठकींचे विशेष आयोजन केले जाते. कार्यक्रमांच्या वेळासाठी कार्यक्रम पत्रिका पहावी


बाल संस्कार व युवा केंद्रे

माया अपार्टमेन्टस व अध्यात्म मंगल धाम येथे नियमित बाल संस्कार व युवा केंद्रे घेतली जातात. तसेच कांही शाळा व महाविद्यालयात देखील अशी केंद्रे घेतली जातात


साधना शिबिरे

री साधकाश्रम , भूगाव येथे ३ दिवसांचे निवासी साधना शिबीर दर महिन्याला आयोजित केले जाते . या शिबिरात साधनेच्या विशेष बैठकीबरोबर सत्संग सारखे कार्यक्रम आयोजित होतात.


स्वामी माधवनाथ बोध प्रसारक सेंटर , अमेरिका

अमेरिकास्थित साधकांच्या सोयीसाठी या सेंटर च्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले जातात . दर महिन्यात दोन वेळा टेलीफोनच्या माध्यमातून केंद्रे होतात ज्यात पहिल्या व तिसऱ्या रविवारी अमेरिकेतील साधक टेलीफोनद्वारे सहभागी होतात. या केंद्राला स्वामी मकरंदनाथ व जेष्ठ मार्गदर्शक यापैकी एकजण पुण्याहुन जोडलेले असतात.


प्रकाशने

मंडळ परमार्थावर आधारित ग्रंथ, ऑडियो व विडीयो कॅसेट व सीडी यांचे प्रकाशन करते. मंडळाने स्वामी माधवनाथांच्या व स्वामी मकरंदनाथांच्या प्रवचन व सत्संगावर आधारित तीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत. या सर्व ग्रंथातून कर्म भक्ती ध्यान व ज्ञान याविषयी स्वामीजींनी मार्गदर्शन केले आहे.