1.  परमार्थ / अध्यात्माचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे?
2.  आध्यात्मिक / पारमार्थिक आयुष्य म्हणजे काय ?
1. परमार्थ / अध्यात्माचा माझ्या जीवनाशी काय संबंध आहे?

आपल्या जीवनात आनंद नेहमी काहीतरी इतर गोष्टींवर अवलंबून असतो. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या असल्यास आपण आनंदी होतो, आणि त्या न झाल्या तर आपण निराश होतो. अध्यात्म आपल्याला बिनशर्त आणि शाश्वत आनंद घेण्याची कला शिकवते म्हणून अध्यात्म आपल्या जीवनात संबंधित आहे. आपले आंतरिक सुख हि मनाची स्थिती नाही तर ती आत्म्याची स्थिती आहे. अध्यात्म हि ज्ञानाची अशी शाखा आहे जी आत्मज्ञानाविषयी आणि आत्मसुखाविषयी विचार करते. जी आपणाला आपले जीवन एका उंच पातळीवरून जगण्याची प्रेरणा देते.

2. आध्यात्मिक / पारमार्थिक आयुष्य म्हणजे काय ?

पारमार्थिक आयुष्य जगणे म्हणजे आपले नेहमीचेच आयुष्य एका विशिष्ठ बोधाने जगणे , एका उंच पातळीवर नेणें. आपल्या आयुष्यातील कर्मे करताना आपल्या आत्म्याला सतत स्मरून आत्मज्ञानासाठी करणे हे आध्यात्मिक आयुष्य. साहजिकच असे आयुष्य हे प्रेम , शांती , दया , क्षमा , करुणा आदि गुणांनी युक्त असते. त्यामुळे फक्त ती व्यक्तीच नव्हे तर तिच्या संपर्कातील सर्वांना सुखाचा अनुभव येतो.