स्वामी माधवनाथ
मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित्मान् वेत्ती तत्वतः
( || भगवद्गीता ७ - ३ || )
स्वामी मकरंदनाथ
मानवी आयुष्यातील प्रगती सहसा सामाजिक प्रगती आणि भौतिक भरभराट या दृष्टीने मोजली जाते. अध्यात्मिक प्रगतीमध्ये खरी उन्नती आहे याकडे आपल्यापैकी कितीजण लक्ष देतात. भौतिक भरभराटीकडे लक्ष देतांना अध्यात्मिक पूर्णतेचा दृष्टीकोन कदापी सोडू नये. खरी प्रगती हि आपल्यातील आत्मज्ञानाला जाणण्यात आहे. भगवदगीता मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखविते. भारतीय तत्वज्ञान लौकिक प्रगती (अभ्युदय) बरोबर आत्मज्ञानाचा (निश्रेयस) पुरस्कार करते. श्री माधवनाथ बोध प्रसारक मंडळ भगवदगीता , ज्ञानेश्वरी , दासबोध इ. मध्ये सांगीतलेले ह्याच शुद्ध तत्वज्ञानचा प्रचार व प्रसार करत आहे. मंडळ यासाठी साधकांना प्रवचने, ध्यान केंद्रे , ग्रंथ प्रकाशन या मार्फत तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करत आहे.
पत्ता: गणेशपुरम, २१६३, सदाशिव पेठ, स्नेहनगर, निलायम टॉकीज जवळ, पुणे ४११०३०